आमच्या काळात नाही हो व्हायचे असे दात खराब..


 आज-काल आजी-आजोबा , आई-वडील जेव्हा आपल्या नातवांना ,मुलांना घेऊन दवाखान्यात येतात तेव्हा त्यांच्याकडे हा एकच प्रश्न असतो; का आजकाल मुलांचे दात एवढे खराब होतात..?आमच्या काळी तर असं नव्हतं. माझी आई, माझी आजी वयाच्या 80-90 व्या वर्षी वारली पण सगळे दात कसे ठणठणीत.! आणि ही मुलं वयाच्या तिसऱ्या वर्षी यांना रूट कॅनल करावे लागते काय बरे याचे कारण..? 

काळानुसार बदल होतातच.आपले राहणीमान ,आपल्या कामाच्या पद्धती आणि आपल्या जेवणाच्या पद्धती सुद्धा बदलल्या आहेत. आधीच्या काळात गोड-धोड हे सणासुदीला.रोजचे जेवण म्हणजे साधे वरण-भात-भाजी-पोळी. जेवणाच्या वेळा ठरलेल्या आणि जेवणाचे प्रमाणही snacking हा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता. तेव्हा एसी नसायचे त्यामुळे दिवसभरात उन्हातानात काम केल्यानंतर पाणीही भरपूर प्यायले जायचे.

आज-काल वेळी अवेळी जेवण, snacking, चॉकलेट्स, बर्थडे पार्टी म्हटले की बाहेर जाऊनच सेलिब्रेट करणे, कामाच्या ताणामुळे पाणी पिण्याचे भानच नसते.या आणि अशा अनेक बदलणार्‍या जीवन पद्धतीचे दातांवर ही परिणाम दिसून येतात.

त्यामुळे आता या बदलणार्‍या जीवन पद्धतीमध्ये आपणही काही बदल करायला हवेत.मुलांचे दात किडू नये किंवा आपले दात ही असेच सुरक्षित राहावे यासाठी काही सवयी आपण अंगीकारायला  हव्यात.

1. लहान मुलांचे पहिला दुधाचा दात आला की दातांच्या दवाखान्यात एकदा विजीट करणे.

2. मुलांचे सगळे दात आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फ्लोराइड अप्लिकेशन करून घेणे.

3. मुलांच्या आहारात crunchy food म्हणजे फळ , सलाद, कच्च्या भाज्या जसे काकडी,टोमॅटो,गाजर,बीटरूट,कोबी इ. यांचा समावेश जास्त प्रमाणात असावा.

4. रोज आपण किती पाणी प्यावे याचे प्रमाणही पाळले पाहिजे.कामाच्या व्यापात जर पाणी पिण्याचे लक्षात राहत नसेल तर आजकाल वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स चा ही तुम्ही उपयोग करू शकता.

5. वर्षातून किमान दोन वेळेस दातांच्या दवाखान्यात जाऊन आपल्या दातांची तपासणी करून घेणे. 

शेवटी डेंटिस्टकडे रेग्युलर चेक-अप ला जाऊन ओरिजनल दात सुरक्षित ठेवायचे की निष्काळजीपणा करून किडलेले दात ठीक करण्यासाठी डेंटिस्ट कडे जायचे हा निर्णय तुमचाच आहे. बदल ही काळाची गरज आहे आणि आपण ही आता बदलायला हवे.

डॉ. स्नेहा भाला (दहाड) 

डेंटल स्क्वेअर

9860985088

Comments

Popular posts from this blog

Why my kid has speech problem..?

प्रवास आणि मौखिक आरोग्य

Is wisdom tooth really associated with wisdom..?