फ्लोराइड आणि बरच काही..
फ्लोराइड ट्रीटमेंट ची आवश्यकता कोणाला आहे..?
तुम्ही जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवू इच्छिता तर ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी आहे.
1. लहान मुले
लहान मुले दूध पितात, गोड खातात, कोल्ड्रिंक्स पितात, स्नॅक्स म्हणजे चिप्स, कुरकुरे यासारखे पदार्थ खातात. यातील साखर आणि स्टार्च मुळे ऍसिड तयार होते आणि ते दाताच्या सगळ्यात प्रोटेक्टीव कवच म्हणजे Enamel ला खराब करते.
फ्लोराईड या enamel च्या आत जाऊन त्याला अधिक मजबूत बनवतात आणि या ऍसिड मुळे होणाऱ्या त्याच्या झीजेला कमी करतात.फ्लोराइड मुळे रीमिनरलायझेशन म्हणजेच दातांच्या कवचामध्ये पुन्हा एकदा मिनरल डिपॉझिट होऊन दात मजबूत बनतात.
2. अधिक सेंसिटिव असलेले दात
ऍसिडिक अन्नपदार्थांचे सेवन, अधिक दबाव देऊन ब्रश करणे, मुळातच झिजलेले दात, ऍसिडिटी इ. अशा अनेक कारणांमुळे दातांना सेन्सिटिव्हिटी जाणवते.
फ्लोराईड मुळे होणाऱ्या रिमिनरलायझेशनने दातांची सेन्सिटिव्हिटी कमी होण्यास मदत होते.
3. ज्यांच्या दातांना सहज कीड लागते
जर तुमच्या दातांना लहानपणी कीड लागण्याचे प्रमाण जास्तच असतील किंवा तुमचे दात मुळातच आधी किडलेले असतील तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या उर्वरित दातांना वाचवण्यासाठी फ्लोराइड ट्रीटमेंट चा वापर करू शकता.
4. ड्राय माउथ
काही व्याधींमुळे ,औषधांमुळे, रेडिएशन थेरपीमुळे किंवा जेनेटिक डिसऑर्डर मुळे तोंडात लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते याला ड्राय माऊथ ( xerostomia) म्हणतात . अशा परिस्थितीत दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्हाला ड्राय माउथ असेल तर तुम्ही फ्लोराइड ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे.
5. हिरड्यांचे आजार
हिरड्यांच्या आजारामध्ये (gingivitis or periodontitis),हिरड्या अधिक खाली सरकल्याने दातांच्या मुळांचा भाग उघडा पडतो. अशा परिस्थितीत दातांंची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि कीड लागण्याचे प्रमाणही वाढते. अशा वेळेस फ्लोराइड ट्रीटमेंट ने आराम मिळतो.
6. दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस लावल्यास
वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी जेव्हा दातांना ब्रेसेस लावतात तेव्हा दातांची योग्य काळजी घेतली जात नाही, अशा वेळेस फ्लोराइड ट्रीटमेंट उपयोगात येते.
फ्लोराइड ट्रीटमेंटमध्ये फ्लोराइड ची मात्रा काय असावी..?
काही स्टडीज नुसार साधारण मात्रा खालील प्रमाणे असावी :-
. जन्मल्यापासून तीन वर्ष - 0.1 - 1.5 mg
. चार ते सहा वर्षे - 1 - 1.5 mg
. सात ते आठ वर्षे - 1.5 - 2.5 mg
. प्रौढांसाठी - 2.5 - 4 mg
फ्लोराइड ट्रीटमेंट मध्ये नेमके काय करतात..?
रिंस, फोम, जेल आणि वाँरनीश (Rinse, foam, gel and varnish) अशा चार प्रकारांमध्ये फ्लोराइड ट्रीटमेंट करता येते.
तुमच्या एकूण स्वास्थ्यावरून आणि दातांच्या आरोग्यावरून ट्रीटमेंट ठरवली जाते.
सगळ्यात जास्त चालणारी ट्रीटमेंट म्हणजे टाँपिकल अँप्लिकेशन ऑफ फ्लोराइड (topical flouride application).
तुमच्या दातांच्या आरोग्यावरून साधारण दर तीन महिने, सहा महिने अथवा वर्षातून एकदा ही ट्रीटमेंट केली जाते.
एका ब्रशच्या मदतीने दातांवर फ्लोराईडचे अप्लिकेशन करून तुम्हाला काही काळ थांबावे लागते. त्यानंतर तुम्हाला काहीही न खाणे , पिणे याच्या सूचना दिल्या जातात.कोणत्याही प्रकारचे दुखणे न जाणवता, इंजेक्शन न घेता ही ट्रीटमेंट केली जाते.
ही एक पेनलेस (painless) ट्रीटमेंट आहे जी भविष्यात होणाऱ्या अधिक दुखण्यापासून (pain) वाचवते.
फ्लोराइड ट्रीटमेंट चे काही साईड इफेक्टस् आहेत का..?
अति सर्वत्र वर्ज्यते. कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. त्याच प्रमाणे फ्लोराईडची मात्रा जर कमी जास्त झाली तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जाणवतात.
फ्लोराईड ची मात्रा अधिक झाल्यास खालील गोष्टी उद्भवतात :
. दातांवर पांढरे चट्टे येणे
. दातांमध्ये स्टेनिंग म्हणजे दाग लागणे व खड्डे पडणे
. हाडांना इजा होणे
फ्लोराईड टोक्झीसीटी (flouride toxicity) मुळे खालील गोष्टी उद्भवतात :
. मळमळ
. थकवा
. डायरिया
. अधिक घाम येणे
एक डेंटिस्ट असल्यामुळे मी तुम्हाला हाच सल्ला देईन की कोणतीही ट्रीटमेंट अथवा कोणत्याही गोळ्या, औषधी डॉक्टरांच्या, डेंटिस्ट च्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
आपले दात सुदृढ करण्यासाठी लवकरच आपल्या जवळच्या डेंटिस्ट ला भेटा आणि फ्लोराईड ट्रीटमेंट करून आपले दात अधिक सुदृढ बनवा.
डॉ. स्नेहा भाला (दहाड)
डेंटल स्क्वेअर
9860985088
Comments
Post a Comment