जाऊदे गं आई, आता सुट्ट्या सुरू आहेत ना....
उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की बाहेर फिरायला जाणं, मामाच्या गावी जाणं, दिवसभर मस्ती, दंगा करणं, हवं ते खाणं, हवं तितकं खाणं, हव्या त्या वेळेला खाणं आणि आपल्याला लागलेल्या चांगल्या सवयींचा सपशेल विसर पडणं. आणि आईने जर रागवलं तर आपलं वाक्य तयार "जाऊदे गं आई, आता सुट्ट्याच तर आहे ना".. हाचं असतो लहान मुलांचा सुट्ट्यांचा रुटीन..
त्यामुळेच या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या दातांची, मौखिक आरोग्याची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. खाली दिलेल्या बाबींचे जर व्यवस्थित पालन केले तर सुट्ट्यांमध्ये धमालही करता येईल आणि चांगल्या सवयी मोडण्याची गरजही पडणार नाही.
१. भरपूर पाणी पिणे
२. फळे खाणे. काकडी, टोमॅटो, बीटरूट, गाजर, कच्ची कोबी यांसारख्या कच्च्या भाज्या खाणे. ताजे बनवलेले अन्नपदार्थ सेवन करणे.
३. दुपारी झोपण्याआधी अथवा रात्री झोपण्याआधी गोड पदार्थ, गोड दूध किंवा चिप्स, कुरकुरे यांसारखे दातांना चिकटणारे पदार्थ यांचे सेवन करु नये.
४. बाहेरून काही खाऊन आल्यास, घरी येऊन सर्वात आधी गुळणा करणे.
५. रोज दोनवेळा ब्रश करण्याची आपली सवय मोडू नये.
६. आईसक्रीम, सोडा, चॉकलेट्स इत्यादी दातांना हानिकारक असणाऱ्या पदार्थांचे सेवन कमीत कमी असावे.
७. साखरेचे आणि साखरयुक्त पदार्थाचे सेवन कमीत कमी प्रमाणात करणे.
दातांना कीड लागू नये म्हणून अजून काय उपाय करता येईल यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,
सुट्ट्यांमध्ये मुलांनी काय करावे, काय करू नये हे तर झाले. पण चांगल्या सवयी सुरू करण्याआधी तर मुलांचे दात खराब नाहीत ना, त्यांच्या दातांमध्ये कीड तर नाही ना, यासाठी तुम्ही स्वतः घरी त्यांचे दात तपासा. तुमच्या शंकांचं निरसन झाल्यावर, मुलांच्या दातांची स्थिती तुमच्या लक्षात आल्यावर त्वरित तुमच्या डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा.
सुट्ट्या सुरू होण्याआधीच खालील प्रश्नावली पूर्ण करून तुमच्या डेंटिस्टकडे दाखवणे गरजेचे आहे.
आपल्या मुलांना सोबत बसवावे, खालील प्रश्न वाचून, स्वतःच मुलांच्या तोंडात तपासावे आणि उत्तर 'हो' किंवा 'नाही' असे लिहावे.
१. आपल्या मुलाच्या तोंडाचा कधी वास येतो का?
२. मुलाच्या हिरडीमधून कधी रक्त किंवा पू येतो का?
३. मुलाच्या दातांमध्ये काळ्या रंगाचे डाग आहेत का? असल्यास त्यांची संख्या.
४. किती दातांमध्ये खोल असे खड्डे आहेत? त्यांची संख्या?
५. जेवताना कधी दात दुखतात का? त्यामुळे कधी जेवायला टाळाटाळ करतात ?
६. आता किंवा पूर्वी कधी दात दुखले आहेत?
७. रात्री दात दुखतात का ?
८. रात्री झोपताना गोड दुध (साखर किंवा bournvita टाकून) पितात काआ?
९. दिवसभरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस चॉकलेट किंवा पाकीट बंद पदार्थ खातात का?
जर वरील प्रश्नानं पैकी ६ पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरं 'हो' असल्यास आपल्या मुलांसाठी त्वरित दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आजच आपल्या मुलाची तपासणी साठी खालील नंबर वर अपाँइंटमेंट घ्या.
डॉ स्नेहा भाला (दहाड)
डेंटल स्क्वेअर
9860985088
Comments
Post a Comment