प्रवास आणि मौखिक आरोग्य

प्रवास करायचा म्हटला की आधी तयार होते ती यादी. तिकीट, कपडे, खाण्याचे सामान, मोबाइल चार्जर, हेडफोन,  टॉयलेटरी, काही वाचक लोकांच्या यादीत असतात पुस्तकं, तर काही जागरुक लोकांच्या यादीत असतं फर्स्ट एड बॉक्स. या सर्व यादीत आपण टुथब्रश हमखास विसरतो आणि मग गावाला गेलो की तिथे बघू असा विचार करून टाळतो.

आता यापुढे To-Go Oral kit म्हणजेच दातांची काळजी घेण्यासाठी लागणारी एक छोटी किट सगळ्यांच्या यादीत असावी असा मी आग्रह धरते. या किट मध्ये काय काय सामान तुम्ही घ्यावे हे पुढीलप्रमाणे :
1. टूथब्रश
2. टूथपेस्ट
3. डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार माऊथ वॉश
4. डेंटिस्ट ने तुम्हाला लिहून दिलेले इंटरडेंटल ब्रश, हिरड्यांना मालिश करायचे मलम, अथवा इतर औषधी... 
5. टंग क्लीनर, डेंटल फ्लौस
6. डेंटिस्ट च्या सल्ल्यानुसार दातांच्या दुखण्यावर एक पेन किलर

आता ही झाली तुमची कीट तयार. पण या सोबतही प्रवासात दातांची विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी तुम्ही प्रवासात पाळल्या तर तुमच्या  दातान सोबत पूर्ण शरीराची देखभाल होईल.

1. प्रवासात भरपूर पाणी प्या
 प्रवासात खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित नसतात आणि आपण स्नेकींग करतो, बरेच  विविध पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त्त पाणी पिल्याने तोंड नेहमी स्वच्छ  राहते, डीहायड्रेशन होत नाही, तोंड कोरडे पडत नाही म्हणजेच दातांची उत्तम काळजी घेतली जाते.
2. दातांसाठी अनुकूल पदार्थ खावे
दातांसाठी अनुकूल पदार्थ म्हणजे काही कच्चे सलाद, फळ यांचा सेवन जास्त करावा.चिप्स कुरकुरे चॉकलेट्स यांचे प्रमाण टाळावे. 

3. दातांचा वापर खाणे आणि हसणे या व्यतिरिक्त करू नये
बऱ्याचदा बाहेर प्रवासात दातांचा वापर चिप्सची पाकीटं फोडणे, बॉटल्सचे झाकण उघडणे, एखादी वायर कापणे इ. अशा विविध गोष्टींसाठी केला जातो. ते प्रकार टाळावे.

4. ओरल किट मध्ये नेहमी एक्स्ट्रा सामान ठेवावे
वर सांगितल्याप्रमाणे आपण एक ओरल किट बनवलीवापरा. पण त्यात ब्रश आणि टूथपेस्ट नेहमी एक एक्स्ट्रा असावे. पेस्ट, माऊथ वॉश बाकी गोष्टी मिनी साइज मध्ये घ्याव्या. टूथब्रश ला एका  क्याप लावून ठेवण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. नेहमी क्याप (cap ) व्यतिरिक्त टूथब्रश वापरावा. ब्रश, टंग क्लिनर पूर्ण वाळल्या शिवाय किट मध्ये ठेवू नये.

5. दात स्वच्छ करण्याचे रुटीन पाळावे
आपण बाहेरगावी असलो तरी सुद्धा आपले रोजचे दात स्वच्छ करण्याचे रुटीन पाळावे. दोन वेळेस ब्रश करणे, फ्लॉस करणे  टंग क्लीन करणे इत्यादी गोष्टी न चुकता कराव्यात.
6. शुगर फ्री गम चा वापर
सतत फिरस्तीवर असाल किंवा स्वतः गाडी चालवत असाल अशा वेळेस शुगर फ्री गमचा वापर करावा. याने तुमचे दात स्वच्छ राहण्यास मदत होते आणि तोंडात थोडा ओलावा ही राहतो.

7. डेंटिस्ट अपॉइंटमेंट
जर प्रवास आठ दिवसांपेक्षा जास्त असेल तर प्रवासाला जाण्याआधी आपल्या डेंटिस्टकडे एकदा चेक अप करावे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधी इतर वस्तू आपल्या ओरल किटमध्ये ठेवाव्या. आणि प्रवासाहून परत आल्यावर पुन्हा एकदा दातांची तपासणी करून घ्यावी.

या सर्व गोष्टींचे पालन करा. आपले मौखिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य जपा. 

              Happy Holiday.. Happy journey.. 

डॉ. स्नेहा भाला (दहाड) 
डेंटल स्क्वेअर
9860985088

Comments

Popular posts from this blog

Why my kid has speech problem..?

Is wisdom tooth really associated with wisdom..?