वेडेवाकडे दात सरळ केलेच पाहिजेत का..?
साधारणतः वेडेवाकडे दात सरळ करणे, म्हणजे फक्त आपले हास्य सुधारण्यासाठी केले जाते, सुंदर दिसण्यासाठी केले जाते असा समज लोकांमध्ये आहे. पण वेडे वाकडे दात सरळ करणे हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही, तर सुदृढ मौखिक आरोग्यासाठी फार गरजेचे आहे.
वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस, अलाइनर्स किंवा प्रोस्थेटिक ट्रीटमेंट असे विविध पर्याय आहेत. तुमचे सौंदर्य खुलवण्याशिवायही आरोग्याच्या दृष्टीने ही ट्रीटमेंट महत्त्वाची असते. याचे विविध फायदे आता आपण पाहूया.
१. हिरड्यांच्या आजारापासून सुरक्षा
दातांमध्ये खूप जास्त फटी असतील किंवा एकावर एक दात असतील, अशा वेळेस दात घासण्यास कठीण जाते. अशा परिस्थितीत अन्नकण तेथे अटकून हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांत पस जमा होणे, हिरड्यातून रक्त येणे असे आजार उद्भवतात. दात सरळ करण्याच्या ट्रीटमेंट नंतर दातांमधील फटी कमी होतात आणि दात स्वच्छ करणे सोयीचे होते, जेणेकरून हिरड्यांचे आजार रोखण्यास मदत होते.
२. दोन दातांच्या मध्ये कीड लागण्याचे प्रमाण कमी होते
दातांमध्ये फटी किंवा एकावर एक दात असल्याकारणाने तयार झालेल्या फटीमध्ये अन्नकण अडकतात. तेथे कुजतात आणि दातांना कीड लागते. अशी जागा स्वच्छ करणे ही कठीण जाते. एकदा दात सरळ झाले की दातांना ब्रश करणे सोपे होते आणि दातांना कीड लागण्याचे प्रमाणही कमी होते.
३. मौखिक इजा टाळता येतात
वेडेवाकडे, पुढे आलेले दातांना ॲक्सीडेंट किंवा खेळताना इजा होण्याचे प्रमाण जास्त असते. दात सरळ झाल्यावर हे प्रकार टाळता येतात. वेडेवाकडे असलेले दात जीभ, ओठ यांनाही इजा करतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात.
४. उत्तम बोलण्यास आणि उच्चार सुधारण्यास मदत होते
दातांमध्ये असलेल्या फटी किंवा दातांंची झालेली गर्दी यामुळे जिभेच्या हालचालीला अडथळा येतो आणि उच्चार स्पष्ट्ट होत नाहीत. दातांना सरळ केल्याने ही अडचण दूर होते.
५. अन्नपचनास मदत होते
दात वेडेवाकडे असल्यानेेे वरील आणि खालील दात एकमेकांवर व्यवस्थित बसत नाहीत. त्यामुळे चर्वनास अडथळा येतो. जर अन्न व्यवस्थित चावले गेले नाही तर त्याचेेे पचन होणे कठीण असते. दात सरळ करताना फक्त पुढील दात सरळ केले जात नाहीत, तर मागील दातांची एकमेकांवर असलेली ठेवणही सुधारली जाते. यामुळेेेे अन्नपचनास मदत होते.
६. जबड्याच्या सांध्याचे दुखणे कमी होते
वेड्यावाकड्या दातांमुळे, दातांच्या एकमेकांवर असलेल्या चुकीच्याा ठेवणीमुळे, दात एकमेकांवर चुकीच्या पद्धतीने घासले गेल्याने, जबड्याच्या सांध्यावर ताण पडून त्याचेे दुखणे सुरू होते. दात सरळ करण्याची ट्रीटमेंट वेळीच केल्यावर हा त्रास टाळता येतो.
७. आत्मविश्वास वाढतो
दात सरळ झाल्यावर तुमच्या सौंदर्यात भर पडते आणि त्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो.
आता वरील माहिती वाचल्यानंतर, सुदृढ आणि आत्मविश्वासाने भरपूर हास्य मिळवण्यासाठी, जर तुम्ही तुमचे वेडेवाकडे दात सरळ करण्याचा दृढ निश्चय केला आहे अथवा तुम्हाला वाटते भविष्यात दात सरळ करण्यासाठी तुमच्या मुलाला उपचार करावे लागतील, तर..... आम्ही डेंटल स्क्वेअर दातांच्या दवाखान्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहोत. आमच्याकडे दात सरळ करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत. पण यातून तुमच्यासाठी अथवा तुमच्या पाल्यासाठी का योग्य आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
1 तुमचे वय काय?
A अठरा वर्षांच्या वर
B अठरा वर्षांखाली
2 तुमच्या तोंडात अजूनही दुधाचे दात आहेत का?
A नाही
B हो
3 तुमच्या तोंडातील काही दात पडलेत किंवा आलेच नाही असे आहे का? ( मिसिंग टीथ)
A नाही
B हो
4 तुम्हाला वेडे वाकडे दात का सरळ करायचे आहेत?
A माझे हास्य अजून सुंदर करण्यासाठी
B मला चांगले बोलता यावे व खाता-पिता यावे यासाठी
5 तुमचे समोरचे दात फारच पुढे अथवा फारच मागे आहेत का?
A नाही
B हो
6 तुम्हाला सतत डोकेदुखी होते किंवा जबड्याच्या सांध्यात दुखते का?
A नाही
B हो
7 तुम्ही उपचारासाठी किती वेळ देऊ इच्छिता?
A लवकरात लवकर
B कितीही वेळ लागला तर हरकत नाही
8 दात सरळ करण्याच्या उपचार पद्धती बद्दल तुमच्या मनात काय भीती आहे?
A तारेमुळे माझा चेहरा चांगला दिसणार नाही
B या उपचाराने फरक पडेल की नाही
9 तुम्ही याआधी ही उपचार पद्धती आजमवली आहे का?
A नाही
B हो
जर तुमचे A उत्तर पाच किंवा पाच पेक्षा जास्त वेळेस असेल, तर तुम्हाला अलाईनर लावणे जास्त योग्य ठरेल.याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
जर तुमचे B उत्तर 5 किंवा पाच पेक्षा अधिक वेळा असेल, तर तुम्हाला ब्रेसेस लावणे गरजेचे आहे.
आता तुम्हाला ब्रेसेस, अलाईनर्स, दात सरळ करण्याच्या ट्रीटमेंट बद्दल अजूनही काही प्रश्न असतील किंवा माहिती जाणून घ्यायची असेल, तर लवकरच डेंटल स्क्वेअर मध्ये अपॉईंटमेंट बुक करा आणि आपले हास्य, आत्मविश्वास आणि मौखिक आरोग्य परत मिळवाा.
डॉ स्नेहा भाला (दहाड)
डेंटल स्क्वेअर
9860985088
Comments
Post a Comment