मुलांच्या पक्या दाढी आणि सीलंटस्....
सिलंटस् (Pit and Fissure sealants) म्हणजे काय..?
दातांना कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी सिलंटस् हा एक वेदनारहित उपाय आहे. चावताना दातांच्या वापरात येणाऱ्या भागावर प्लास्टिक कोटींचे काम सिलंटस् करतात. दातांमध्ये नैसर्गिकरित्या असणाऱ्या भेगांमध्ये अन्न अडकून दात किडतात, अशा ठिकाणी एक कठीण आवरण बनवण्याचं काम सिलंटस् करतात.
कोणत्या दातांवर सिलंटस् वापरतात..?
सिलंटस् हे मागच्या दाढी साठी व उपदाढी साठी असते. डेंटिस्टकडे जाऊन मागच्या डाढींची व उपदाढींची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
सिलंटस् ची उपचार पद्धती नेमकी कशी असते..?
या उपचार पद्धती साठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. दातांना आधी स्वच्छ केले जाते, मग त्यावर एक विशेष सोल्युशन लावले जाते. त्यानंतर सिलंटस् लावून लाईटने ते सेट केले जाते.
ही उपचार पद्धती केव्हा करावी..?
वयाच्या सहाव्या अथवा सातव्या वर्षी पहिली पक्की दाढ येते. तर तेव्हा सिलंटस् वापरून दातांना वाचवायला हवे. त्यानंतर साधारण वयाच्या 10 ते 14 वर्षांमध्ये मागील पक्क्या दाढी व उपदाढी यायला सुरुवात होते, तर दहा ते चौदा वर्षांच्या वयात डेंटिस्टकडे तपासणी करणे गरजेचे आहे.
सिलंटस् किती वर्षे टिकतात..?
सिलंटस् वर्षानुवर्षे टिकतात, तरी दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन सिलंटस् ची सद्यस्थिती तपासून घेणे गरजेचे आहे.
वरील दिलेली माहिती वाचल्यानंतरही तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये कळवा. त्वरित आपल्या लहान मुलांना डेंटिस्टकडे न्या व सिलंटस् चा वापर करून दातांची कीड टाळा. म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर..
PREVENTION IS BETTER THAN CURE
डॉ स्नेहा भाला (दहाड )
डेंटल स्क्वेअर
9860985088
Comments
Post a Comment