Posts

Showing posts from September, 2024

दोन मिलिमीटर आणि आत्मविश्वास ..

Image
नमस्कार.. मी या माध्यमातून नेहमीच दातांच्या निगराणी बद्दल, दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल, दातांच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींबद्दल सांगत असते. दात खराब होऊ नये यासाठी काय करावे आणि ते झालेच तर काय करावे लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी असे वेगवेगळ्या विषयांवर आत्तापर्यंत मी तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे..      पण आजचा जरा विशयच वेगळा आहे. आजच दवाखान्यात घडलेला एक किस्सा तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावा असं वाटलं.        आज नेहमीप्रमाणे पेशंट सुरू होते. एक दोन ओपीडी झाल्या त्यानंतर एक पेशंट बाहेर वेटिंगमध्ये थांबली होती. तिने कंपाउंडर जवळ आपले नाव नोंदवले, मॅडमला किती वेळ आहे, आज किती पेशंट आहे, अजून मला किती वेळ लागणार, मॅडमचा काम कसा आहे इत्यादी बऱ्याच चौकशा केल्या. त्यानंतर ती तिचा नंबर येण्यासाठी वाट बघत बसली होती. माझा पेशंट संपला आणि मी त्याची एंट्री लॅपटॉप मध्ये करत असताना ती मुलगी माझ्या केबिनमध्ये आली. एकदम गोड आवाजात म्हणाली "नमस्ते मॅडम".. अतिशय सुंदर गोड हास्य असलेली ती मुलगी हसतच मला म्हटली "नमस्ते".. पण तिचं...