दोन मिलिमीटर आणि आत्मविश्वास ..


नमस्कार..
मी या माध्यमातून नेहमीच दातांच्या निगराणी बद्दल, दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल, दातांच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींबद्दल सांगत असते. दात खराब होऊ नये यासाठी काय करावे आणि ते झालेच तर काय करावे लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी असे वेगवेगळ्या विषयांवर आत्तापर्यंत मी तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे..
     पण आजचा जरा विशयच वेगळा आहे. आजच दवाखान्यात घडलेला एक किस्सा तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावा असं वाटलं. 
      आज नेहमीप्रमाणे पेशंट सुरू होते. एक दोन ओपीडी झाल्या त्यानंतर एक पेशंट बाहेर वेटिंगमध्ये थांबली होती. तिने कंपाउंडर जवळ आपले नाव नोंदवले, मॅडमला किती वेळ आहे, आज किती पेशंट आहे, अजून मला किती वेळ लागणार, मॅडमचा काम कसा आहे इत्यादी बऱ्याच चौकशा केल्या. त्यानंतर ती तिचा नंबर येण्यासाठी वाट बघत बसली होती. माझा पेशंट संपला आणि मी त्याची एंट्री लॅपटॉप मध्ये करत असताना ती मुलगी माझ्या केबिनमध्ये आली. एकदम गोड आवाजात म्हणाली "नमस्ते मॅडम"..
अतिशय सुंदर गोड हास्य असलेली ती मुलगी हसतच मला म्हटली "नमस्ते".. पण तिचं हास्य असं खुललेलं नव्हतं. मी तिला हॅलो म्हटल्यावर ती जरा थोडंसं हसली. मग लगेच तिला मी शहर वर बसायला सांगितलं आणि तिला काय त्रास होतोय हे विचारलं. तेव्हा तिने मला सांगितलं, "माझे समोरचे दात खूपच मोठे आहेत आणि त्यामुळे माझा पूर्ण कॉन्फिडन्स ढासळतो. मला बोलताना चांगलं वाटत नाही आणि मी समोरच्याशी बोलू शकत नाही. मला हे मोठे दात नकोत, मला ते चांगले नाही वाटत. त्यासाठी मी घरी सुद्धा प्रयत्न केलेत दातमागे करण्याचे पण ते काय होऊ शकलं नाही. आणि आता माझे सगळेच दात दुखायला लागलेत."
मी आपलं सहज विचारलं, "दात मागे घेण्यासाठी तू घरी काय असे प्रयत्न केले..?"
त्यावर ती बोलली, "मी youtube वर एक व्हिडिओ बघितला होता आणि तो व्हिडिओ बघून मी माझ्याच हाताने रबर बँड दातांना लावून त्यांना बांधून मागे करण्याचा प्रयत्न करत होते."

मला तिचा अगदी नवलच वाटलं. म्हणजे आता तिची समजूत घालावी, तिला तिने काय चूक केली हे समजवावं, का तिने केलेल्या प्रकारावर हसावं हेच मला कळत नव्हतं. मग मी तिला सांगितलं की तुझी स्माईल खूप सुंदर आहे. यापुढे असे कोणतेही व्हिडिओ बघून दातांना स्वतः सुधरण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तुला समोरच्या दोनच दातांचा त्रास होतोय ना तर एक 10 मिनिटांत मी तुला हवे तसे दात करून देऊ शकते. पण माझी एकच अट आहे की तू यापुढे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतही काम स्वतःहून करणार नाहीस. 
  तिचा चेहरा इतका खुल्ला म्हणून सांगू. मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदा ती इतक्या मोकळेपणाने हसली असणारे. इनामलोप्लास्टी म्हणून एक प्रोसिजर असते, त्याने मी तिच्या दोघ दातांना तिला अगदी हवे तसे करून दिले. 
तिला आरसा दाखवला आणि लगेच ती हसली आणि म्हणाली "परफेक्ट".. तिचं ते हास्य बघून मलाही खूप आनंद झाला. 

खरंच दातांच्या त्यात दोन मिलिमीटर मोठ्या असण्याने तिला तिचं दिसणं नकोस होतं. तिचा सगळा आत्मविश्वास गेला होता. तिने स्वतःहून आपल्या दातांवर वेगवेगळे प्रयोग करण्याचेही प्रयत्न करावे, इतपत तिची स्वतःच्या हास्याला घेऊन नाराजी होती. तिला क्लिनिक मधून परत जाताना असं हसत पाहिल्यावर मला आज त्या दोन मिलिमीटरचा अर्थ कळला. 

तुम्हाला जर असे किस्से अजून वाचायचे असतील तर प्लीज खाली कमेंट करा. आणि दातांशी निगडित काहीही समस्या असतील तर दवाखान्यात कॉन्टॅक्ट करा. 

डॉ स्नेहा भाला दहाड 
डेंटल स्क्वेअर 
जळगाव 

Comments

Popular posts from this blog

Why my kid has speech problem..?

प्रवास आणि मौखिक आरोग्य

Is wisdom tooth really associated with wisdom..?