स्केलिंग म्हणजे नेमके काय..?


स्केलिंग म्हणजे दात साफ करणे. दातांवर लागलेले डाग, दातांवर जमा होणारा प्लाक, टार्टर काढणे आणि हिरड्यांना मजबूत करण्यात मदत करणे.
आपण जेव्हा रोज जेवण करतो, चावताना त्यात लाळ मिश्रित होते. तोंडात काही बॅक्टेरिया असतात, ते अन्नपचनाचे काम करतात. अन्न, लाळ आणि हे बॅक्टेरिया एकत्र येउन अन्नपचनाची ची क्रिया पार पाडतात. या प्रक्रियेत कार्बोहायड्रेटचे आसिड मध्ये रुपांतर होते. काही अन्नकण दातांमध्ये अडकून तेथे प्लाक तयार होते.
प्लाक म्हणजे दातांच्या वर एक पातळ लेयर असते. ते जास्त काळ जमा झाले की त्याचा रंग पिवळा , काळा होत जातो आणि ते कडक होत जाते. यालाच टार्टर म्हणतात. हे टार्टर वाढण्यासाठी हिरड्यांच्या आत दातांवर जमा होत जाते जेणेकरून हिरड्यांची दातांवरील पकड कमी होते व दात ढिले होतात.

स्केलिंग दोन पद्धतीने केले जाते. उपकरणांच्या साह्याने हाताने केले जाते, ज्याला हँड स्केलिंग (hand scaling) म्हणतात. अथवा अल्ट्रासोनिक स्केलर (ultrasonic scaler) मशीनच्या साह्याने केले जाते.
स्केलिंग केव्हा करावे..? 
१. तोंडाचा वास येणे
२. हिरड्यातून रक्त येणे
३. हिरड्यातून पस येणे (Pyorrhea) 
४. हिरड्या खाली सरकून दातांची मुळे उघडी पडणे
५. दात हालणे
६. दातांवर पिवळे-काळे कडक असे डाग असणे
७. दातांवर तंबाखू गुटखा स्मोकिंग चे डाग असणे

पॉलिशिंग ही स्केलिंग नंतर करायची पुढची स्टेप. पॉलिशिंग मध्ये एका विशिष्ट पेस्ट आणि ब्रशच्या सहाय्याने दातांवर  पॉलिश करतात. याने दातांच्या वर आलेले स्क्रँचेस कमी होतात व दात गुळगुळीत बनतात .

या सर्व उपचारानंतर एक सगळ्यात महत्वाची स्टेप असते, ती म्हणजे फ्लोराइड ॲप्लिकेशन. याबद्दल सगळेच डेंटिस्ट तुम्हाला माहिती देतात असे नाही. स्केलिंग नंतर फ्लोराइड ॲप्लिकेशन करण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि दातांवर एक प्रोटेक्टीव लेयर तयार होते ज्याने दातांवर कीड लागण्याचे ही कमी होते. 
फ्लोराइड बद्दल अजून वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


प्लाक आणि टार्टर मुळे दातांची आणि हिरड्यांची हानी होण्यापासून वाचवण्यासाठी, लवकरच आपल्या डेंटिस्टकडे दातांची तपासणी करून घ्या. आणि त्यांच्या सांगण्यानुसार वर्षातून, दोन वर्षातून अथवा सहा महिन्यातून एकदा स्केलिंग करा. तुमच्या अजून काही शंका असल्यास खाली कमेंटमध्ये विचारा.

डॉ स्नेहा भाला (दहाड) 
डेंटल स्क्वेअर
9860985088

Comments

Popular posts from this blog

Why my kid has speech problem..?

प्रवास आणि मौखिक आरोग्य

Is wisdom tooth really associated with wisdom..?