आता बदला तुमचे हास्य कोणाच्याही नकळत...क्लियर आलायनर्स..

क्लियर अलायनर किंवा इनविजीबल अलायनर  (clear aligner/ invisible aligner) म्हणजे वेडे वाकडे दात सरळ करण्याची एक उपचार पद्धती आहे. ब्रेसेस साठी एक उत्तम पर्याय पद्धती म्हणून, प्रत्यक्षात न दिसणारे आणि काढता घालता येणारे असे, क्लिअर अलायनर्स सध्या चर्चेत आहेत.

अलायनरने कोणत्या प्रकारचे दात सरळ करता येऊ शकतात..?


एकावर एक चढलेले दात सरळ करणे.

पुढे आलेले वरील दात सरळ करणे.

दातांमध्ये असलेल्या फटा घालवणे.

समोरचे दात एकमेकांना लागत नाही असे दात सरळ करणे.

पुढे आलेले खालील दात सरळ करणे.

अलाइनर नेमके कसे काम करतात..? 

1. ट्रीटमेंट प्लान :

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डेंटीस्ट ला भेट द्या. या दरम्यान ते तुमच्या दातांची ठेवण तुमच्या चेहर्‍याची ठेवण यांचा व्यवस्थित अभ्यास करतील. तुमच्या दातांच्या ठेवणीनुसार किती उपचाराची गरज आहे यावर तुमचे अलायनर्स कोणते आणि किती असतील हे ठरवले जाते. तुमचा एक विशिष्ट ट्रीटमेंट प्लान तयार झाल्यानंतर, तुम्हाला लॅपटॉप वर डिजिटली, तुमच्या दातांची ठेवण कशी बदलणार आहे म्हणजेच तुमचे हास्य कसे फुलणार आहे याचे एक  पूर्वावलोकन ( preview) दाखवले जाते.

2. अलाइनर बनवणे :

त्यानंतर तुमच्या दातांचे माप घेतले जातात. त्या मापानुसार 3D टेक्नॉलॉजीने तुमचा ट्रीटमेंट प्लान बनवला जातो. एकदा का ते मॉडेल तयार झाले की त्यावर तुमचे अलायनर्स बनवले जातात. इथून तुमच्या अलायनर ट्रीटमेंट ला सुरुवात होते.

3. अलायनर कसे वापरावे :

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर आठवड्याला, तीन आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला डेंटिस्टकडे जावे लागेल. अलायनर चे ट्रे 1 - 2 mm नुसार दातांची सूक्ष्म हालचाल करतात, त्यामुळे तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार ते बदलण्यासाठी डेंटिस्टकडे जावे लागते. अलायनर ने कमी वेळेत प्रभावीपणे चांगले रिझल्ट द्यावे यासाठी त्याला दिवसातून 20 ते 22 तास घालून ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या दातांच्या ठेवणीनुसार 3 महिने ते 24 महिने ही ट्रीटमेंट चालू शकते.

4. ट्रीटमेंट नंतर घ्यावयाची काळजी :

ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सरळ झालेल्या दातांचे नवीन माप घेतले जाते आणि त्यापासून एक क्लीयर रिटेनर बनवले जाते. याला तुम्हाला रोज रात्री घालून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून दातांची हि ठेवण बदलणार नाही.

क्लिअर अलायनर  ब्रेसेस ला उत्तम पर्याय का आहे..? 

1. आरामदायक (comfortable):

ब्रेसेस पेक्षा अलायनर अधिक आरामदायक असतात. ब्रेसेस मुळे ओठांना, जिभेला, गालाला होणारी इजा किंवा त्रास अलायनर मध्ये उद्भवत नाही.

2. वेदनारहित ( pain free) :

दातांच्या हलण्यामुळे थोडे दुखणे असते, पण ब्रेसेस पेक्षा आयलायनर मध्ये दुखण्याचे प्रमाण कमी असते.

3. काढता घालता येण्यायोग्य (detachable) :

अलायनर तुम्हाला काढून ठेवता येतात. जेवण करायला सोपे असते. याउलट ब्रेसेस तुम्हाला काढता येत नाही, ते कायमस्वरूपी ट्रीटमेंट पूर्ण होउसपर्यंत दातांना लावलेल्या असतात.

4. परिणामकारक (result oriented) :

ब्रेसेसपेक्षा अलाइनर ने कमी वेळात चांगले रिझल्ट मिळतात.

5. दिसण्यास योग्य (esthetic) :

अलायनरला इनविसिबल एवढ्यासाठीच म्हणतात कारण ते घातल्यानंतर घातले आहे की नाही हेच कळत नाही. दिसण्याच्या दृष्टीने अलाइनर केव्हाही ब्रेसेस पेक्षा उत्तम ठरतात.

6. वयोमर्यादा नाही :

अलायनर मुळे तुम्हाला कोणत्याही वयात दातांना सरळ करता येऊ शकते. म्हणजेच तुम्ही कोणत्याही वयात आपले हास्य सुंदर बनवू शकतात आणि आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकता.


मी पुरवलेल्या माहितीने तुमच्या शंकेचे निरसन झाले असावे असे मी समजते. चला तर मग लवकरच आपल्या डेंटिस्टकडे जाऊन अलायनर बद्दल माहिती मिळवा आणि आपले हास्य अजून सुंदर करा. तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट मध्ये विचारा.

डॉ.स्नेहा भाला (दहाड) 

डेंटल स्क्वेअर

9860985088


Comments

Popular posts from this blog

Why my kid has speech problem..?

प्रवास आणि मौखिक आरोग्य

Is wisdom tooth really associated with wisdom..?