मुलांच्या पक्या दाढी आणि सीलंटस्....
सिलंटस् (Pit and Fissure sealants) म्हणजे काय..? दातांना कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी सिलंटस् हा एक वेदनारहित उपाय आहे. चावताना दातांच्या वापरात येणाऱ्या भागावर प्लास्टिक कोटींचे काम सिलंटस् करतात. दातांमध्ये नैसर्गिकरित्या असणाऱ्या भेगांमध्ये अन्न अडकून दात किडतात, अशा ठिकाणी एक कठीण आवरण बनवण्याचं काम सिलंटस् करतात. कोणत्या दातांवर सिलंटस् वापरतात..? सिलंटस् हे मागच्या दाढी साठी व उपदाढी साठी असते. डेंटिस्टकडे जाऊन मागच्या डाढींची व उपदाढींची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. सिलंटस् ची उपचार पद्धती नेमकी कशी असते..? या उपचार पद्धती साठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. दातांना आधी स्वच्छ केले जाते, मग त्यावर एक विशेष सोल्युशन लावले जाते. त्यानंतर सिलंटस् लावून लाईटने ते सेट केले जाते. ही उपचार पद्धती केव्हा करावी..? वयाच्या सहाव्या अथवा सातव्या वर्षी पहिली पक्की दाढ येते. तर तेव्हा सिलंटस् वापरून दातांना वाचवायला हवे. त्यानंतर साधारण वयाच्या 10 ते 14 वर्षांमध्ये मागील पक...