स्केलिंग म्हणजे नेमके काय..?
स्केलिंग म्हणजे दात साफ करणे. दातांवर लागलेले डाग, दातांवर जमा होणारा प्लाक, टार्टर काढणे आणि हिरड्यांना मजबूत करण्यात मदत करणे. आपण जेव्हा रोज जेवण करतो, चावताना त्यात लाळ मिश्रित होते. तोंडात काही बॅक्टेरिया असतात, ते अन्नपचनाचे काम करतात. अन्न, लाळ आणि हे बॅक्टेरिया एकत्र येउन अन्नपचनाची ची क्रिया पार पाडतात. या प्रक्रियेत कार्बोहायड्रेटचे आसिड मध्ये रुपांतर होते. काही अन्नकण दातांमध्ये अडकून तेथे प्लाक तयार होते. प्लाक म्हणजे दातांच्या वर एक पातळ लेयर असते. ते जास्त काळ जमा झाले की त्याचा रंग पिवळा , काळा होत जातो आणि ते कडक होत जाते. यालाच टार्टर म्हणतात. हे टार्टर वाढण्यासाठी हिरड्यांच्या आत दातांवर जमा होत जाते जेणेकरून हिरड्यांची दातांवरील पकड कमी होते व दात ढिले होतात. स्केलिंग दोन पद्धतीने केले जाते. उपकरणांच्या साह्याने हाताने केले जाते, ज्याला हँड स्केलिंग (hand scaling) म्हणतात. अथवा अल्ट्रासोनिक स्केलर (ultrasonic scaler) मशीनच्या साह्याने केले जाते. स्केलिंग केव्हा करावे..? १. तोंडाचा वास येणे २. हिरड्यातून रक्त येणे ३. हिरड्या...