Posts

मुलांच्या पक्या दाढी आणि सीलंटस्....

Image
सिलंटस् (Pit and Fissure sealants) म्हणजे काय..?  दातांना कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी सिलंटस् हा एक वेदनारहित उपाय आहे. चावताना दातांच्या वापरात येणाऱ्या भागावर प्लास्टिक कोटींचे काम सिलंटस् करतात. दातांमध्ये नैसर्गिकरित्या असणाऱ्या भेगांमध्ये अन्न अडकून दात किडतात, अशा ठिकाणी एक कठीण आवरण बनवण्याचं काम सिलंटस् करतात. कोणत्या दातांवर सिलंटस् वापरतात..?  सिलंटस् हे मागच्या दाढी साठी व उपदाढी साठी असते. डेंटिस्टकडे जाऊन मागच्या डाढींची व उपदाढींची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. सिलंटस् ची उपचार पद्धती नेमकी कशी असते..?  या उपचार पद्धती साठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. दातांना आधी स्वच्छ केले जाते, मग त्यावर एक विशेष सोल्युशन लावले जाते. त्यानंतर सिलंटस् लावून लाईटने ते सेट केले जाते. ही उपचार पद्धती केव्हा करावी..?  वयाच्या सहाव्या अथवा सातव्या वर्षी पहिली पक्की दाढ येते.  तर तेव्हा सिलंटस् वापरून दातांना वाचवायला हवे. त्यानंतर साधारण वयाच्या 10 ते 14 वर्षांमध्ये मागील पक...

वेडेवाकडे दात सरळ केलेच पाहिजेत का..?

Image
साधारणतः वेडेवाकडे दात सरळ करणे, म्हणजे फक्त आपले हास्य सुधारण्यासाठी केले जाते, सुंदर दिसण्यासाठी केले जाते असा समज लोकांमध्ये आहे. पण वेडे वाकडे दात सरळ करणे हे फक्त सुंदर हास्‍यासाठी नाही, तर सुदृढ मौखिक आरोग्यासाठी फार गरजेचे आहे. वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस, अलाइनर्स किंवा प्रोस्थेटिक ट्रीटमेंट असे विविध पर्याय आहेत. तुमचे सौंदर्य खुलवण्याशिवायही आरोग्याच्या दृष्टीने ही ट्रीटमेंट महत्त्वाची असते. याचे विविध फायदे आता आपण पाहूया. १. हिरड्यांच्या आजारापासून सुरक्षा     दातांमध्ये खूप जास्त फटी असतील किंवा एकावर एक दात असतील, अशा वेळेस दात घासण्यास कठीण जाते. अशा परिस्थितीत अन्नकण तेथे अटकून हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांत पस जमा होणे, हिरड्यातून रक्त येणे असे आजार उद्भवतात. दात सरळ करण्याच्या ट्रीटमेंट नंतर दातांमधील फटी कमी होतात आणि दात स्वच्छ करणे सोयीचे होते, जेणेकरून हिरड्यांचे आजार रोखण्यास मदत होते. २. दोन दातांच्या मध्ये कीड लागण्याचे प्रमाण कमी होते      दातांमध्ये फटी किंवा एकावर एक दात असल्याकारणाने  तयार झालेल्या फटीमध्ये ...

स्केलिंग म्हणजे नेमके काय..?

Image
स्केलिंग म्हणजे दात साफ करणे. दातांवर लागलेले डाग, दातांवर जमा होणारा प्लाक, टार्टर काढणे आणि हिरड्यांना मजबूत करण्यात मदत करणे. आपण जेव्हा रोज जेवण करतो, चावताना त्यात लाळ मिश्रित होते. तोंडात काही बॅक्टेरिया असतात, ते अन्नपचनाचे काम करतात. अन्न, लाळ आणि हे बॅक्टेरिया एकत्र येउन अन्नपचनाची ची क्रिया पार पाडतात. या प्रक्रियेत कार्बोहायड्रेटचे आसिड मध्ये रुपांतर होते. काही अन्नकण दातांमध्ये अडकून तेथे प्लाक तयार होते. प्लाक म्हणजे दातांच्या वर एक पातळ लेयर असते. ते जास्त काळ जमा झाले की त्याचा रंग पिवळा , काळा होत जातो आणि ते कडक होत जाते. यालाच टार्टर म्हणतात. हे टार्टर वाढण्यासाठी हिरड्यांच्या आत दातांवर जमा होत जाते जेणेकरून हिरड्यांची दातांवरील पकड कमी होते व दात ढिले होतात. स्केलिंग दोन पद्धतीने केले जाते. उपकरणांच्या साह्याने हाताने केले जाते, ज्याला हँड स्केलिंग (hand scaling) म्हणतात. अथवा अल्ट्रासोनिक स्केलर (ultrasonic scaler) मशीनच्या साह्याने केले जाते. स्केलिंग केव्हा करावे..?  १. तोंडाचा वास येणे २. हिरड्यातून रक्त येणे ३. हिरड्या...

जाऊदे गं आई, आता सुट्ट्या सुरू आहेत ना....

Image
 उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की बाहेर फिरायला जाणं, मामाच्या गावी जाणं, दिवसभर मस्ती, दंगा करणं, हवं ते खाणं, हवं तितकं खाणं, हव्या त्या वेळेला खाणं आणि आपल्याला लागलेल्या चांगल्या सवयींचा सपशेल विसर पडणं. आणि आईने जर रागवलं तर आपलं वाक्य तयार "जाऊदे गं आई, आता सुट्ट्याच तर आहे ना".. हाचं असतो लहान मुलांचा सुट्ट्यांचा रुटीन..  त्यामुळेच या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या दातांची, मौखिक आरोग्याची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. खाली दिलेल्या बाबींचे जर व्यवस्थित पालन केले तर सुट्ट्यांमध्ये धमालही करता येईल आणि चांगल्या सवयी मोडण्याची गरजही पडणार नाही. १. भरपूर  पाणी पिणे २. फळे खाणे. काकडी, टोमॅटो, बीटरूट, गाजर, कच्ची कोबी यांसारख्या कच्च्या भाज्या खाणे. ताजे बनवलेले अन्नपदार्थ सेवन करणे. ३. दुपारी झोपण्याआधी अथवा रात्री झोपण्याआधी गोड पदार्थ, गोड दूध किंवा चिप्स, कुरकुरे यांसारखे दातांना चिकटणारे पदार्थ यांचे सेवन करु नये. ४. बाहेरून काही खाऊन आल्यास, घरी येऊन सर्वात आधी गुळणा करणे. ५. रोज दोनवेळा ब्रश करण्याची आपली सवय मोडू नये. ६. आईसक्रीम, सोडा, चॉकलेट...

प्रवास आणि मौखिक आरोग्य

Image
प्रवास करायचा म्हटला की आधी तयार होते ती यादी. तिकीट, कपडे, खाण्याचे सामान, मोबाइल चार्जर, हेडफोन,  टॉयलेटरी, काही वाचक लोकांच्या यादीत असतात पुस्तकं, तर काही जागरुक लोकांच्या यादीत असतं फर्स्ट एड बॉक्स. या सर्व यादीत आपण टुथब्रश हमखास विसरतो आणि मग गावाला गेलो की तिथे बघू असा विचार करून टाळतो. आता यापुढे To-Go Oral kit म्हणजेच दातांची काळजी घेण्यासाठी लागणारी एक छोटी किट सगळ्यांच्या यादीत असावी असा मी आग्रह धरते. या किट मध्ये काय काय सामान तुम्ही घ्यावे हे पुढीलप्रमाणे : 1. टूथब्रश 2. टूथपेस्ट 3. डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार माऊथ वॉश 4. डेंटिस्ट ने तुम्हाला लिहून दिलेले इंटरडेंटल ब्रश, हिरड्यांना मालिश करायचे मलम, अथवा इतर औषधी...  5. टंग क्लीनर, डेंटल फ्लौस 6. डेंटिस्ट च्या सल्ल्यानुसार दातांच्या दुखण्यावर एक पेन किलर आता ही झाली तुमची कीट तयार. पण या सोबतही प्रवासात दातांची विशिष्ट काळजी घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी तुम्ही प्रवासात पाळल्या तर तुमच्या  दातान सोबत पूर्ण शरीराची देखभाल होईल. 1. प्रवासात भरपूर पाणी प्या   प्रवासात खाण्यापिण्याच्या वेळा निश्चि...

आता बदला तुमचे हास्य कोणाच्याही नकळत...क्लियर आलायनर्स..

Image
क्लियर अलायनर किंवा इनविजीबल अलायनर  (clear aligner/ invisible aligner) म्हणजे वेडे वाकडे दात सरळ करण्याची एक उपचार पद्धती आहे. ब्रेसेस साठी एक उत्तम पर्याय पद्धती म्हणून, प्रत्यक्षात न दिसणारे आणि काढता घालता येणारे असे, क्लिअर अलायनर्स सध्या चर्चेत आहेत. अलायनरने कोणत्या प्रकारचे दात सरळ करता येऊ शकतात..? एकावर एक चढलेले दात सरळ करणे. पुढे आलेले वरील दात सरळ करणे. दातांमध्ये असलेल्या फटा घालवणे. समोरचे दात एकमेकांना लागत नाही असे दात सरळ करणे. पुढे आलेले खालील दात सरळ करणे. अलाइनर नेमके कसे काम करतात..?  1. ट्रीटमेंट प्लान : सर्वप्रथम तुम्ही तुमच्या डेंटीस्ट ला भेट द्या. या दरम्यान ते तुमच्या दातांची ठेवण तुमच्या चेहर्‍याची ठेवण यांचा व्यवस्थित अभ्यास करतील. तुमच्या दातांच्या ठेवणीनुसार किती उपचाराची गरज आहे यावर तुमचे अलायनर्स कोणते आणि किती असतील हे ठरवले जाते. तुमचा एक विशिष्ट ट्रीटमेंट प्लान तयार झाल्यानंतर, तुम्हाला लॅपटॉप वर डिजिटली, तुमच्या दातांची ठेवण कशी बदलणार आहे म्हणजेच तुमचे हास्य कसे फुलणार आहे याचे एक  पूर्वावलोकन ( preview) दाखवल...

फ्लोराइड आणि बरच काही..

Image
दातांचा सगळ्यात मजबूत भाग म्हणजे त्याचे सर्वात बाहेरील आवरण.. एनँमल (Enamel). हे आवरण असेच पक्के ठेवण्यात मदत करतात - फ्लोराईड. कित्येक दशकांपासून फ्लोराइड ट्रीटमेंटचा वापर मौखिक आरोग्य जपून ठेवण्यासाठी केला जातो. फ्लोराइड ट्रीटमेंट ची आवश्यकता कोणाला आहे..? तुम्ही जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवू इच्छिता तर ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी आहे. 1. लहान मुले लहान मुले दूध पितात, गोड खातात, कोल्ड्रिंक्स पितात, स्नॅक्स म्हणजे चिप्स, कुरकुरे यासारखे पदार्थ खातात. यातील साखर आणि स्टार्च मुळे ऍसिड तयार होते आणि ते दाताच्या सगळ्यात प्रोटेक्टीव कवच म्हणजे Enamel ला खराब करते. फ्लोराईड या enamel च्या आत जाऊन त्याला अधिक मजबूत बनवतात आणि या ऍसिड मुळे होणाऱ्या त्याच्या झीजेला कमी करतात.फ्लोराइड मुळे रीमिनरलायझेशन म्हणजेच दातांच्या कवचामध्ये पुन्हा एकदा मिनरल डिपॉझिट होऊन दात मजबूत बनतात. 2. अधिक सेंसिटिव असलेले दात ऍसिडिक अन्नपदार्थांचे सेवन, अधिक दबाव देऊन ब्रश करणे, मुळातच झिजलेले दात, ऍसिडिटी इ. अशा अनेक कारणांमुळे दातांना सेन्सिटिव्हिटी जाणवते. फ्लोराईड मुळे होणाऱ्या रिमिनरलायझे...